स्माईल डेंटल क्लिनिक, धाराशिव


Root Canal Treatment in Dharashiv

रूट कॅनल उपचार म्हणजे काय?

रूट कॅनल उपचार (रूट कॅनल ट्रीटमेंट) हा दातांचा एक उपचार आहे. ज्यामध्ये खराब झालेला दाता काढून टाकण्याऐवजी त्याचे जतन केले जाते.
Root canal treatment is one of the advanced dental treatments which is performed in order to preserve a damaged tooth; rather than tooth extraction.

दात हा तीन थरांनी बनलेला असतो. बाहेरचा कडक थर enamel (इनामेल) असा असतो. त्याच्या आतून मऊ पल्प (पल्प) असते ज्यामध्ये मज्जातंतू (नस) आणि रक्तवाहिन्या (रक्त वाहिन्या) असतात. या पल्पमध्ये जंतुसंसर्ग (इन्फेक्शन) झाला तर दातांना तीव्र वेदना होते.

रूट कॅनल उपचारामध्ये दंतचिकित्सक (डेंटिस्ट Dentist) खराब झालेला पल्प काढून टाकतात. मग रूट कॅनल्स (रूट कॅनाल्स) म्हणजे दात मुळांच्या अंतर्गत मार्ग स्वच्छ करून त्यांचे सील (सील) करतात. शेवटी, दाता कमकुवत झाला असल्यास त्यावर कृत्रिम मुकुट (dental cap / crown) बसवले जाऊ शकते. रूट कॅनल ज्या दाताला करणे आहे तो दात हिरड्यांच्या आजरा पासुन मुक्त असणे गरजेचे आहे.

आपल्याला रूट कॅनल उपचाराची आवश्यकता कधी पडेल?

  1. दातांमध्ये तीव्र वेदना Severe dental pain
  2. थंड किंवा उष्ण पदार्थ खाताना वेदना Dental hypersensitivity
  3. दाताला सूज येणे Dental swelling
  4. दाता तुटण्याची शक्यता

रूट कॅनल उपचार वेदनादायक नसतो कारण उपचारादरम्यान दंतचिकित्सक इंजेक्शन देऊन दात numb बधीर (anesthetise) करतात.

रूट कॅनल उपचार हे वेदनारहित असतात. उपचारासाठी दातांना भूल दिलेली असते त्यामुळे उपचार पूर्णतः सुसह्य असते.

डॉ. श्रीकांत कवठेकर  Dr. Shrikant Kawathekar

रूट कॅनल उपचाराबद्दल अधिक सविस्तर माहिती जाणून घेऊया

Dental Tooth Dr Shrikant Kawathekar

रूट कॅनल म्हणजे काय? What is Root Canal Treatment?

आपल्या दाताला तीन थर असतात:

  1. बाहेरचा कडक थर – इनामेल (Enamel): हा दाताचा सर्वांत दृढ थर असून हा खायचे पदार्थ चावण्याचे काम करतो. यामध्ये कोणत्याही मज्जातंतू नसतात.
  2. मधला थर – डेंटीन (Dentin): हा थोडा कमी कठोर असतो पण इनामेल इतका कमकुवत नसतो. यामध्ये काही मज्जातंतू असतात.
  3. आतील थर – पल्प (Pulp): हा दाताचा मऊ आतील भाग असून येथे मज्जातंतू (नस), रक्तवाहिन्या (रक्त वाहिन्या) आणि इतर ऊती असतात. पल्पमध्ये जंतुसंसर्ग (इन्फेक्शन) झाला तर दातांना तीव्र वेदना होते.

रूट कॅनल म्हणजे पल्प (Pulp) आणि त्याच्याशी जोडलेल्या दात मुळांच्या (Root) अंतर्गत मार्गांना (Canals) असे म्हणतात. रूट कॅनल उपचारामध्ये या पल्प आणि रूट कॅनल्सवर उपचार केले जातात.

रूट कॅनल उपचार कधी आवश्यक असतो?

खालील समस्या असल्यास रूट कॅनल उपचार आवश्यक असू शकतो:

  1. तीव्र दातांची वेदना: दातांमध्ये गंभीर जंतुसंसर्ग झाल्यास असह्य वेदना होऊ शकते. थंड, गरम, गोड पदार्थ खाताना किंवा दातावर थोडासाही दाब पडल्यास वेदना होऊ शकते.
  2. सूज: जंतुसंसर्गामुळे दाताच्या आसपासच्या ऊतींमध्ये सूज येऊ शकते. यामुळे जबडा दुखणे, चेहरा सुजणे असे त्रास होऊ शकतात
  3. दातांची किड: दातामध्ये मोठी किंवा खोलवर पोकळी पडली असल्यास तेथे जंतुसंसर्ग होऊ शकतो.
  4. पूर्वी केलेल्या फिलिंगमध्ये जंतुसंसर्ग: दातामध्ये आधीच फिलिंग केलेली असेल आणि त्या ठिकाणी जंतुसंसर्ग झाला तर रूट कॅनल उपचार आवश्यक असू शकतो.

रूट कॅनल उपचार कसा केला जातो?
रूट कॅनल उपचार सामान्यत: एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये केला जातो. प्रत्येक सत्रामध्ये साधारणपणे 30 ते 60 मिनिटे लागू शकतात.

उपचार कसा केला जातो ते जाणुन घेऊया:

  1. एक्स-रे (X-ray): सर्वप्रथम दंतचिकित्सक (डेंटिस्ट) दाताचा एक्स-रे (X-ray) घेऊन जंतुसंसर्गाची व्याप्ती तपासतात.
  2. इंजेक्शन (Injection): उपचार वेदनादायक न करण्यासाठी दाताला बधीर/numb (नंब) करणारे इंजेक्शन दिले जाते.
  3. मार्ग (Access Cavity): दंतचिकित्सक दाताच्या वरच्या बाजूला एक छोटासा मार्ग (access cavity) करतात. या द्वारे पल्प आणि रूट कॅनल्सवर प्रवेश मिळवला जातो.
  4. पल्प आणि जंतुसंसर्ग काढणे: दातामधून पल्प आणि जंतुसंसर्ग झालेले नस/ऊती काढून टाकले जातात.
  5. त्याठिकाणी ठराविक कृत्रिम पदार्थ भरला जातो.

Image source: Link.

डॉ. श्रीकांत कवठेकर यांना रूट कॅनाल ट्रीटमेंटसाठी १५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. स्माईल डेंटल क्लिनिक धाराशिव येथे Root Canal Treatment आणि Endodontic treatments साठी आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. या उपचारांसाठी आपण नियमितपणे दर्जेदार साहित्यांचा वापर करतो.

Dr. Shrikant Kawathekar your Dentist in Osmanabad / Dharashiv is having experience of more than 15 years in advanced endodontic treatments including Root Canal  Treatments. Smile Dental Clinic is well equipped for all types of root canal treatments.