Gum Diseases and Prevention
हिरड्यांचे रोग (Gum Diseases):
हिरड्यांचे रोग, ज्याला पेरियोडॉन्टल डिजीज (Periodontal Disease) म्हणूनही ओळखले जाते, हे हिरड्या आणि दातांच्या सपोर्टिव्ह टिशू (tissues) चा दीर्घकालीन संसर्ग आहे. हे ब्याक्तेरीया च्या थारामुळे (plaque) होते जे दातांच्या हिरड्यांच्या जवळ (gumline) तयार होते. जर वेळी निश्चित स्वच्छता केली नाही तर, plaque कठोर होऊन टारटर /tartar (calculus) बनते. Plaque आणि tartar हिरड्यांना जळजळ आणि सूज येण्यास कारणीभूत ठरतात आणि हिरड्यांचे नुकसान करतात.
हिरड्यांच्या रोगाच्या वेगवेगळ्या अवस्था (Stages of Gum Disease)
- जिंजिवायटीस (Gingivitis): हिरड्यांच्या रोगाची सुरुवातीची अवस्था जिंजिवायटीस आहे. या अवस्थेत हिरड्या लाल, सुजले आणि रक्तस्त्राव (bleeding) होण्याची लक्षणे दिसतात. योग्य स्वच्छता आणि दंत चिकित्सकाकडून केली जाणारी पॉलिशिंग (polishing) या अवस्थेत सुधारणा करू शकते.
- पेरियोडॉन्टायटीस (Periodontitis): जिंजिवायटीसवर उपचार न केल्यास periodontitis किंवा पायारीया या हिरड्यांच्या रोगाच्या गंभीर अवस्थेत पोहोचू शकते. या अवस्थेत हिरड्यांची मात्रा कमी होते (recession) आणि दातांना आधार मिळत नाही. यामुळे दात ढिले होतात (loose teeth), चावताना वेदना होते (pain while chewing), आणि संवेदनशीलता (sensitivity) वाढते. कांही वेळेस कांही दातांना हिरड्याच्या उपचाराबरोबर रूट कॅनल उपचाराची सुद्धा गरज पडू शकते. गंभीर स्थितीत दात पडू शकतात.
हिरड्यांच्या आरोग्याची काळजी (Maintaining Healthy Gums)
- नियमित स्वच्छता (Brushing and Flossing): दररोज दोन वेळा सॉफ्ट-ब्रिसल्ड ब्रश आणि फ्लुओराइडयुक्त टूथपेस्ट वापरून ब्रश करणे आवश्यक आहे. रात्री झोपेच्या आधी फ्लॉसचा वापर करून दातांच्या दरम्यान जमलेला plaque आणि अन्न कण food particles काढून टाका.
- आहार (Diet): साखरयुक्त पदार्थ आणि रिफाइंड कार्बोहाइड्रेट्स कमी खा. हे पदार्थ plaque तयार होण्यास मदत करतात. फळे, भाज्या आणि पौष्टिक आहार घ्या ज्यामुळे हिरड्यांचं बळ (strength) राखण्यास मदत होते.
- धुम्रपान टाळणे (Smoking Cessation): सिगरेट आणि तंबाखू मुळे हिरड्यांच्या रोगाचा धोका वाढवते आणि उपचार प्रक्रियेत अडथळा निर्माण करतात.
- नियमित दंत चिकित्सकीय तपासणी (Dental Checkups): दंत चिकित्सकाकडे नियमित तपासणी करा (six months) जेणेकरून हिरड्यांच्या रोगाची सुरुवातीच्या अवस्थेत ओळख होऊ शकेल आणि योग्य उपचार मिळू शकेल.
हिरड्यांचे रोग हा एक नियंत्रित करता येणारा आणि प्रतिबंधात्मक (preventable) आजार आहे. योग्य स्वच्छता, आहार आणि दंत चिकित्सकीय काळजी घेऊन हिरड्यांचे आरोग्य राखता येते आणि एक सुंदर, निरोगी स्मित (smile) मिळवता येते.

Gum disease is a preventable and manageable condition. By following good oral hygiene practices, maintaining a healthy diet, and visiting your dentist regularly, you can keep your gums healthy and protect your smile..
Prevention of Gum Disease:
- Brush twice daily with a soft-bristled toothbrush and fluoride toothpaste.
- Floss daily to remove plaque and food particles from between teeth.
- Eat a healthy diet low in sugar and refined carbohydrates.
- Avoid smoking and tobacco use.
- See your dentist regularly for checkups and cleanings.
Gum diseases, also known as periodontal disease, is an infection of the gums and the tissues that support your teeth. It is caused by the buildup of bacteria in plaque, a sticky film that forms on the gumline. If not removed regularly, plaque can harden into tartar, which further irritates and inflames the gums, leading to gum damage.
Stages of Gum Disease:
- Gingivitis: This is the early stage of gum disease. Symptoms include red, swollen, and bleeding gums. With proper oral hygiene and professional cleaning, gingivitis can be reversed.
- Periodontitis: If left untreated, gingivitis can progress to periodontitis, a more serious form of gum disease. Periodontitis causes gum recession, exposing the roots of your teeth and making them loose. This can lead to pain, sensitivity, and even tooth loss.
Symptoms of Gum Disease:
- Bleeding gums
- Swollen gums
- Red gums
- Gaps between teeth
- Pain while chewing
- Bad breath
बऱ्याच वेळेस हिरड्यांच्या आजाराची सुरुवात हि पूर्णपणे वेदनारहित असते; त्यामुळे आपल्याकडून दुर्लक्ष होण्याची शक्यता असते!
Dr. Shrikant Kawathekar, Smile Dental Clinic, Dharashiv
For any treatment related to any issue with your gums kindly visit Dr. Shrikant Kawathekar at Smile Dental Clinic Samarth Nagar Dharashiv.
जर आपण वरील सांगितलेल्या हिरड्या संबंधी कोणत्याही लक्षणांनी त्रस्त असाल तर आपल्याला त्वरित उपाचाराची गरज आहे . डॉ श्रीकांत कवठेकर यांना हिरड्याच्या उपचारासंबंधी प्रदीर्घ अनुभव आहे. हिरड्यांच्या कोणत्याही समस्येसाठी आपण स्माईल डेंटल क्लिनिक समर्थ नगर धाराशिव येथे संपर्क करू शकता.