About Us

आमच्याबद्दल थोडक्यात: स्माईल डेंटल क्लिनिक
स्माईल डेंटल क्लिनिकची स्थापना सन २००८ मध्ये समर्थ नगर, उस्मानाबाद येथे झाली आहे. सुरुवातीपासूनच स्माईल डेंटल क्लिनिक हे दातांच्या उपचारासाठी धाराशिव (उस्मानाबाद) शहर परिसरासाठी प्रगत दंत उपचारासाठीचे एक विश्वसनीय केंद्र राहिले आहे.
सर्व प्रकारचे दातांचे उपचार एका छताखाली उपलब्ध झाल्यामुळे दातांच्या समस्या असणाऱ्या रुग्णासाठी योग्य सुविधा उपलब्ध झाली आहे. दातांचे छोटेसे दुखणे असो किंवा दातांसंबंधी शस्त्रक्रिया असोत; आम्ही सर्वोत्तम सेवा देत सर्व रुग्णांना वेदानमुक्त करण्या बरोबरच त्यांना त्यांच्या जीवनाचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी मदत केली आहे. असा आमचा पूर्ण विश्वास आहे…..
आम्हाला माहित आहे की कोणतेही छोटे किंवा मोठे दातांचे उपचार हे फक्त दातांपुरते मर्यादित असत नाहीत तर तो एक अनुभव असतो. दातांच्या प्रत्येक उपचारासाठीचा आपला अनुभव सुखद आणि वेदनारहित राहिल याची आम्ही पुरेपूर काळजी घेतो. रुग्ण सेवेच्या प्रदीर्घ अनुभवामुळे आमच्या सेवा निरंतर प्रगतीपथाकडे वाटचाल करत राहिल्या आहेत. आज पर्यंतच्या हजारो समाधानी रुग्णांमुळे आम्हालाही आमच्या सेवा सुविधांमध्ये उत्तरोतर वाढ आणि प्रगती करण्याची संधी मिळत आहे.
-
अपॉइंटमेंट आवश्यक आहे का, की मी थेट येऊ शकतो/शकते?
शक्य असल्यास आधी फोन किंवा WhatsApp करून अपॉइंटमेंट घेणे उत्तम, जेणेकरून तुम्हाला वाट पाहावी लागणार नाही. मात्र तातडीच्या समस्येसाठी तुम्ही थेट क्लिनिकमध्ये देखील येऊ शकता.
-
दातांच्या इमर्जन्सीसाठी संपर्क कसा करावा?
तीव्र दातदुखी, सूज किंवा अपघातात दात तुटल्यास आमच्या नंबरवर लगेच कॉल किंवा WhatsApp करा — 9420535263. OPD वेळेत आम्ही तातडीने तुम्हाला भेटीची वेळ देण्याचा प्रयत्न करतो.
-
पैसे भरण्यासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत?
रोख (Cash), UPI आणि कार्ड पेमेंट — सर्व पर्याय क्लिनिकमध्ये उपलब्ध आहेत.
-
क्लिनिकमध्ये पार्किंगची सुविधा आहे का?
हो, क्लिनिकजवळ दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे.
-
उपचाराचा खर्च आधी कळू शकतो का?
हो, सर्वसामान्य उपचारांचे अंदाजे दर आमच्या “Fees & Charges” पानावर दिले आहेत. अचूक खर्च तपासणीनंतर सांगितला जातो.
