Endodontics

या उपचाराचे प्रमुख उद्देश खालीलप्रमाणे आहेत:

इतर दातांचे रक्षण: संसर्ग शेजारील दातांमध्ये किंवा हिरड्यांमध्ये पसरण्यापासून रोखणे.

वेदना कमी करणे: दातामधील तीव्र वेदना आणि सूज थांबवणे.

संसर्ग नष्ट करणे: दाताच्या मुळातील बॅक्टेरिया आणि खराब झालेली नस (pulp) काढून टाकणे.

दात वाचवणे: नैसर्गिक दात काढून टाकण्याऐवजी तो सुरक्षित ठेवणे.

दाताचे कार्य पूर्ववत करणे: पुन्हा व्यवस्थित चावता आणि बोलता येणे शक्य करणे.

दात हा मुक्यतः तीन थरांनी बनलेला असतो. बाहेरचा कडक थर इनामेल (Enamel) असा असतो. त्याच्या आत डेंटीन (Dentin), हा आपल्या हाडांशी साधर्म्य असलेला जाड थर आहे. त्याच्या आत मऊ पल्प (Dental Pulp) असतो, ज्यामध्ये मज्जातंतू (Nerves) आणि रक्तवाहिन्या (Blood Vessels) असतात. या पल्पमध्ये जंतुसंसर्ग (इन्फेक्शन) झाला तर दातांना तीव्र वेदना होते.

Parts of Human Tooth Dr. Shrikant Kawathekar

रूट कॅनल उपचारामध्ये दंतचिकित्सक (डेंटिस्ट) खराब झालेला पल्प काढून टाकतात. मग रूट कॅनल्स (Root Canals) म्हणजे दात मुळांच्या अंतर्गत मार्ग स्वच्छ करून त्यांचे सील (Seal) करतात. शेवटी, दाता कमकुवत झाला असल्यास त्यावर कृत्रिम मुकुट (Crown/Cap) बसवले जाऊ शकते.

आपल्याला रूट कॅनल उपचाराची आवश्यकता कधी पडेल?

  1. दातांमध्ये तीव्र वेदना
  2. गंज किंवा उष्ण पदार्थ खाताना वेदना
  3. दाताला सूज येणे
  4. दाता तुटण्याची शक्यता

What is Endodontics Dentistry?

दाताच्या आत असलेल्या पल्पमध्ये रक्तवाहिन्या आणि मज्जातंतू असतात. पल्पला संसर्ग किंवा गंभीर इजा झाल्यास त्या भागावर उपचार करण्यासाठी रूट कॅनाल उपचार केला जातो. या उपचाराची सोप्या भाषेत माहिती रूट कॅनल मार्गदर्शक लेखात दिली आहे. या उपचारात दाताच्या आतील संक्रमित किंवा खराब झालेली नस काढून रूट कॅनाल स्वच्छ करून बंद केला जातो.

स्थानिक भूल देऊन रूट कॅनाल उपचार केला जात असल्यामुळे उपचारादरम्यान वेदना कमी ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.

उपचारापूर्वी दात व आजूबाजूचा भाग पुरेसा बधीर केला जातो.

  • 01 – तपासणी व X-ray
    दाताची स्थिती आणि मुळाभोवतीचा संसर्ग तपासला जातो.

  • 02 -स्थानिक भूल (Local Anesthesia)
    उपचारादरम्यान आराम राहण्यासाठी दात व आसपासचा भाग बधीर केला जातो.

  • 03 – दातामध्ये छोटा प्रवेशमार्ग
    दाताच्या आतील पल्पपर्यंत पोहोचण्यासाठी छोटा मार्ग तयार केला जातो.

  • 04 – संक्रमित खराब झालेली नस काढणे व रूट कॅनाल स्वच्छ करणे
    दाताच्या आतील भागामध्ये असलेली दाताची नस (Dental Pulp) स्वच्छ आणि निर्जंतूक करणे.

  • 05 – रूट कॅनाल भरून बंद करणे
    स्वच्छ आणि निर्जंतूक झालेले रूट कॅनाल हे ठराविक पदार्थांनी भरून घेतले जातात. याला Root Canal Sealing असे म्हणतात.

  • 06 – दाताची अंतिम पुनर्बांधणी / Crown
    यानंतर त्या दाताला गरजेनुसार मजबुतीसाठी पुनर्बांधणी करून योग्य पद्धतीचा दात (Dental Cap/Crown/Bridge) बसवला जातो.

दातांची काळजी, आजच सुरू करा!

नियमित तपासणी आणि योग्य उपचारांनी दातांचे आरोग्य जपा.

अपॉइंटमेंट बुक करा →
Root Canal Treatment Procedure
✅ रूट कॅनाल❎ दात काढणे
नैसर्गिक दात जतन करण्याचा प्रयत्ननैसर्गिक दात गमावला जातो
चावण्याची नैसर्गिक क्षमता राखता येतेनंतर replacement आवश्यक होऊ शकते
दाताची रचना शक्य तितकी जतन होतेजागा रिकामी राहते
योग्य केस असल्यास उपयोगीदात वाचवणे शक्य नसल्यास पर्याय