
डेंटल इम्प्लांट म्हणजे काय?
एक किंवा अनेक दात जर कोणत्याही कारणामुळे पडले असतील किंवा काढून टाकावे लागले असतील तर त्या ठिकाणी कृत्रिम दात बसवणे गरजेचे असते. कृत्रिमरीत्या दात बसवल्यामुळे निघुनगेलेल्या नैसर्गिक दातांचे अनेक कार्य पार पडले जातात. जसे की अन्न चावणे, इतर दातांना आधार देणे, चेहऱ्याची नैसर्गिक रचना आणि सौंदर्य अबाधित ठेवणे इत्यादी.
ज्याप्रमाणे आपले नैसर्गिक दात हे आपल्या जबड्याच्या हाडांमध्ये स्थिर असतात त्याच प्रमाणे डेंटल इम्प्लांट (Dental Implant) हे सुद्धा त्याच हाडामध्ये बसवले जातात. डेंटल इम्प्लांट हे त्याच्या स्थैर्यासाठी आजूबाजूच्या नैसर्गिक दातांवर अवलंबून असत नाहीत.
साधारणपणे डेंटल इम्प्लांटचे दोन भाग असतात. पहिला भाग जो असतो त्याला इम्प्लांट फिक्शर (Implant Fixture) असे म्हणतात. हा भाग टायटॅनियम (Titanium) पासुन बनलेला असून तो आपल्या जबड्याच्या हाडामध्ये तो एकसंघ होतो. या रचनेचा दुसरा भाग म्हणजे इम्प्लांट अबतमेंट (Implant Abutment); हा भाग प्रत्यक्षात दिसणारा दात बसवण्याचा आधार असतो.
डेंटल इम्प्लांट बसवण्याचे अनेक प्रकार आहेत आणि प्रत्येक रुग्णाच्या गरजेनुसार त्यामध्ये फरक असतो. उपचाराचा कालावधी साधारणपणे २ महिने किंवा जास्त असतो. एतर उपचाराप्रमाणे हे उपचारही वेदनारहीत याची पुरेपूर काळजी घेतो.


उपचार कसे असतात?
कोणतेही उपचार करण्यापूर्वीत्यासाठी योग्य नियोजन करणे गरजेचे असते. उपचाराबाबत सर्व माहिती त्या रुग्णाला असणे गरजेचे असते.
डेंटल इम्प्लांटचे फायदे
डेंटल इम्प्लांट ही एक प्रगत उपचार पद्धती आहे. नवनवीन तंत्र ज्ञानामुळे या शास्त्रात दिवसेंदिवस प्रगती होत आहे. याचा फायदा म्हणजे हे उपचार जास्त सोपे सोयीस्कर होण्याबरोबरच पूर्वीपेक्षा कमी खर्चाचे होत आहेत.
- आधुनिक उपचार पद्धती.
- इतर नैसर्गिक दातांवर अवलंबून नाही.
- एक किंवा अनेक फिक्स दात बसवता येतात.
- काढण्या बसवण्याचे दात बसवण्याची गरज नाही.
- सर्वांसाठी सोयीस्कर
उपचार | अंदाजे खर्च* |
---|---|
एक डेंटल इम्प्लांट फिक्शर |
₹१८,००० - ₹३२,००० |
एक इम्प्लांट आधारित दात |
₹१२,००० - ₹१८,००० |
इम्प्लांट आधारित फिक्स कवळी |
किमान ₹ ४ लाख आणि पुढे |
*उपचाराचा खर्च प्रत्येक रुग्णाच्या गरजेनुसार तसेच उपचाराच्या आवश्यक वेगवेगळ्या टप्यानुसार कमी किंवा जास्त असू शकतो.