रूट कॅनल ट्रीटमेंट

दात हा तीन थरांनी बनलेला असतो. बाहेरचा कडक थर इनामेल (Dental Enamel) असा असतो. त्याच्या आतून मऊ पल्प (Dental Pulp) असते ज्यामध्ये मज्जातंतू (Nerves) आणि रक्तवाहिन्या (Blood Vessels) असतात. या पल्पमध्ये जंतुसंसर्ग (Infection) झाला तर दातांना तीव्र वेदना होते.

Parts of Human Tooth Dr. Shrikant Kawathekar Dentist Dharashiv
रूट कॅनल उपचारामध्ये दंतचिकित्सक (Dentist) खराब झालेला पल्प काढून टाकतात. मग रूट कॅनल्स (Root Canals) म्हणजे दात मुळांच्या अंतर्गत मार्ग स्वच्छ करून ते सील (Obturate) करतात. शेवटी, दात कमकुवत झाला असल्यास त्यावर कृत्रिम कॅप (Dental Cap) बसवले जाऊ शकते.
  1. दातांमध्ये तीव्र वेदना (Severe Dental Pain)
  2. थंड किंवा उष्ण पदार्थ खाताना वेदना (Dental Sensitivity to Cold and Hot)
  3. दाताला सूज येणे (Dental Swelling)
  4. दाता तुटण्याची शक्यता (Fractured Tooth)

रूट कॅनल उपचार वेदनादायक नसतो कारण उपचारादरम्यान दंतचिकित्सक इंजेक्शन देऊन दात बधीर करतात.

Root Canal Treatment Steps
Stages of Root Canal Treatment

रूट कॅनल उपचाराबद्दल अधिक सविस्तर माहिती जाणून घेऊया 

आपल्या दाताला तीन थर असतात:

  1. बाहेरचा कडक थर – इनामेल (Enamel): हा दाताचा सर्वांत मजबूत थर असून हा खायचे पदार्थ चावण्याचे काम करतो. यामध्ये कोणत्याही मज्जातंतू नसतात.
  2. मधला थर – डेंटीन (Dentin): हा थोडा कमी कठोर असतो पण इनामेल इतका कमकुवत नसतो. यामध्ये काही मज्जातंतू असतात.
  3. आतील थर – पल्प (Pulp): हा दाताचा मऊ आतील भाग असून येथे मज्जातंतू नस (Nerves), रक्तवाहिन्या (Blood Vessels) आणि इतर ऊती असतात. पल्पमध्ये जंतुसंसर्ग (Infection) झाला तर दातांना तीव्र वेदना होवू शकतात.

रूट कॅनल म्हणजे पल्प (Pulp) आणि त्याच्याशी जोडलेल्या दात मुळांच्या (Root) अंतर्गत मार्गांना (Canals) असे म्हणतात. रूट कॅनल उपचारामध्ये या पल्प आणि रूट कॅनल्सवर उपचार केले जातात.

  1. तीव्र दातांची वेदना: दातांमध्ये गंभीर जंतुसंसर्ग झाल्यास असह्य वेदना होऊ शकते. थंड, गरम, गोड पदार्थ खाताना किंवा दातावर थोडासाही दाब पडल्यास वेदना होऊ शकते. कांहीं वेळेस जंतुसंसर्ग जास्त असेल तरीही वेदना कमी असू शकतात. त्यामुळे फक्त वेदनेच्या तीव्रतेनुसार प्रत्यक्ष समस्येचा पूर्ण अंदाज लावू शकत नाही.
  2. सूज: जंतुसंसर्गामुळे दाताच्या आसपासच्या अवयवांमध्ये सूज येऊ शकते. यामुळे जबडा दुखणे, चेहरा सुजणे असे त्रास होऊ शकतात
  3. दातांची किड: दातामध्ये मोठी किंवा खोलवर पोकळी (Dental Cavity) पडली असल्यास तेथे जंतुसंसर्ग होऊ शकतो.
  4. पूर्वी केलेल्या फिलिंगमध्ये जंतुसंसर्ग: दातामध्ये आधीच फिलिंग केलेली असेल आणि त्या ठिकाणी जंतुसंसर्ग झाला तर रूट कॅनल उपचार आवश्यक असू शकतो.

रूट कॅनल उपचार कसा केला जातो?
रूट कॅनल उपचार सामान्यत: एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये केला जातो. प्रत्येक सत्रामध्ये साधारणपणे 30 ते 60 मिनिटे लागू शकतात.

उपचार कसा केला जातो ते जाणुन घेऊया:
एक्स-रे (X-ray): सर्वप्रथम दंतचिकित्सक दाताचा एक्स-रे (X-ray) घेऊन जंतुसंसर्गाची व्याप्ती तपासतात.
इंजेक्शन (Injection): उपचार वेदनादायक न करण्यासाठी दाताला बधीर numb करणारे इंजेक्शन दिले जाते.
मार्ग (Access Cavity): दंतचिकित्सक दाताच्या वरच्या बाजूला एक छोटासा मार्ग (access cavity) करतो. या द्वारे पल्प आणि रूट कॅनल्सवर प्रवेश मिळवला जातो.
पल्प आणि जंतुसंसर्ग काढणे: दातामधून पल्प आणि जंतुसंसर्ग झालेले नस (infected or damaged pulp tissue) काढून टाकले जातात.